बी. जी. कोळसे पाटलांनी विनयभंग केला; महिला पत्रकाराचा आरोप

0
519

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – निवृत्त न्यायमूर्ती बी. जी कोळसे पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मुलाखत संपली तेव्हा खुर्ची उचलत असताना ती त्यांना लागली. मी त्याबद्दल त्यांना सॉरीही म्हटले आणि वळले तेवढ्यात त्यांनी माझ्या शर्टची कॉलर खेचली आणि म्हटले की तू तुझ्या कुर्त्याचे वरचे बटण उघडं का ठेवलं आहेस? त्यानंतर मला ते सॉरी म्हटले, पण जे काही घडले ते मी विसरू शकलेले नाही, अशी आपबिती पत्रकार संध्या मेनन हिने ट्विटवर कथन केली आहे.

लेखक किरण नगरकर, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर पाब्लो बार्थलोम्यू या तिघांनी लैंगिक गैरवर्तन कशाप्रकारे केले हे सांगणारे ट्विट्स संध्या मेननने केले आहे.

निवृत्त न्यायमूर्ती माझ्याशी असे वर्तन करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपण मित्र आहोत असे मला वाटले म्हणून मी असे केल्याचे त्यांनी मला सांगितले. मात्र, येथे जे काही घडले ते बाहेर कोणालाही सांगू नकोस, अशा विनवण्या त्यांनी मला वारंवार केल्या आणि माझी ते माफीही मागत राहिले. जर येथे जे काही घडले ते तू बाहेर सांगितलेस, तर मी संपून जाईन असेही त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी त्यांचे घर सोडल्यानंतर काही क्षणात त्यांचा मला फोन आला आणि माझ्या विरोधात कोणाकडे काही बोलू नकोस, अशी मला त्यांनी धमकीच दिली.