बीलोली येथील घटनेला एक महिना उलटून सुद्धा मुख्य आरोपीला अटक नाही; आघाडी सरकारचा जाहीर निषेध – अमित गोरखे

0
175

बीलोली येथील घटनेला एक महिना उलटून सुद्धा मुख्य आरोपीला अटक नाही; पालक मंत्र्यांना कुटुंबा ला भेटायला वेळ नाही

नांदेड़, दि. 9 (पीसीबी): नांदेड बिलोली येथील गतिमंद मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली त्या घटनेला १ महिना झाला म्हणून पिढीत कुटुंबाला भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी भेटून आर्थिक मदत केली व मुख्यमंत्री महोदयांन कडे स्थानिक पोलिस अधिकारी, तहसीलदार यांच्या निलंबनाची मागणी केली.

१ महिना उलटून सुद्धा मुख्य आरोपी सापडत नाही. येथील पालक मंत्री अशोक चव्हाण यांना कुटुंबाला भेट द्यायला वेळ नाही, कुठलीही शासकीय ठोस मदत अजूनही कुटुंबाला मिळाली नाही, यात नक्की मोठे जातीय राजकारण आहे. असे अमित गोरखे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शक्ती कायद्याची शक्ती येथे दाखवा व त्वरित आरोपीला अटक करून शक्ती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली व आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. या प्रसंगी स्थानिक माजी नगराध्यक्ष भीमराव झेटे, सचिन आठवले, शेखर साळवे, अनुप कुचेकर, साहेब राव वाघमारे उपस्थित होते.