Pimpri

बिहार निवडणूकीचा विजयोत्सव भाजप कार्यलयात

By PCB Author

November 11, 2020

पिंपरी, दि. 11 (पीसीबी) : बिहार विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि जेडीयू आघाडीने सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक 122 जागा मिळविल्या. भाजपा आणि जेडीयू आघाडीचा विजय झाला आहे.  बिहार विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीला 74 जागा मिळाल्या.

सर्व देशभरात बिहार निवडणुकीचा विजय साजरा होत असताना शहराच्या वतीनेही पक्ष कार्यलयात हा विजय साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहराच्या महापौर माई ढोरे यांनी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांना विजयी पेढा भरवत बिहार निवडणूकीतील पक्षाचा विजय साजरा केला.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, सरचिटणीस विजय फुगे, शहर उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, भाजयमोचे उपाध्यक्ष जवाहर ढोरे, अंकुश लोंढे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, संजय परळीकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखिल बिहार विजयाचा आनंद साजरा केला.

पुन्हा एकदा विकासपुरुष नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व व लोकपयोगी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केल्या मुळेच जनतेने भाजपाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे’ असे मत शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.