Desh

बिहार निवडणुकांसाठी विजया रहाटकर यांची निरीक्षक नेमणूक

By PCB Author

December 07, 2019

महाराष्ट्र, दि.७ (पीसीबी) – भाजपने देशभरातील विविध राज्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांसाठी निरीक्षकांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये बिहारसारख्या महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यात तालुकापातळीपासून ते प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पक्षाच्या वतीने एका राज्यासाठी प्रत्येक दोन वरिष्ठ नेते नेमण्यात आले आहेत. बिहार राज्याची जबाबदारी विजया रहाटकर व केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.