Desh

बिहारमध्ये भरजत्रेत २० महिलांच्या कमरेखाली धारदार ब्लेडने वार

By PCB Author

October 20, 2018

पाटणा, दि. २० (पीसीबी) – बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या जत्रेमध्ये २० महिलांवर धारदार ब्लेडने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेहानाबादच्या ठाकूर बारी भागात दरवर्षी दसऱ्याला जत्रा भरवली जाते. यावेळी  २० ते ३० वयोगटातील महिलांवर हल्ला करण्यात आला. 

या महिलांच्या कमरेखालील भागावर वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर जत्रेमध्ये एकच गोंधळ उडाला. सर्वत्र पळापळ सुरु झाली. स्थानिक अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महिलांना रुग्णालयात दाखल केले.

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. महिलांवर झालेल्या या हल्ल्यानंतर स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. जत्रेला आलेल्या महिला आणि मुलींवर हल्ला होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.