Pimpri

बिल्डींग वरून उडी मारून एकाची आत्महत्या

By PCB Author

June 21, 2021

चिखली, दि. २१ (पीसीबी) – चिखली परिसरातील घरकुल येथे एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. 21) सकाळी घडली. रोहिदास रावजी पिंगळे (रा. बी आठ, घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहिदास पिंगळे हे घरकुल मधील बी 8 या इमारतीत राहतात. त्यांनी ए 16 मातृछाया बिल्डींग वरून उडी मारून आज सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.