Chinchwad

बिजलीनगरमध्ये दुचाकीस्वार पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून फरार

By PCB Author

September 21, 2018

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका तरुणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि.२०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवड बिजलीनगर येथील हनुमान मंदीराजवळ घडली.

याप्रकरणी मनोज अशोक माळी (वय २९, रा. सर्वे नं. ६०/३, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार (एमएच/१४/एफझेड/९९९७) या दुचाकी क्रमांकावरील अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनोज हे चिंचवड बिजलीनगर येथील हनुमान मंदीराजवळून आपल्या घराकडे निघाले होते. यावेळी मागून (एमएच/१४/एफझेड/९९९७)  या क्रमांकाच्या काळ्यारंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी मनोज यांच्या हातावर फटका मारुन त्यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिस्का मारुन चोरु नेला. चिंचवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव तपास करत आहेत.