बिग बॉसच्या घरातून हिना पांचाळ बाहेर

0
586

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – बिग बॉसच्या घरात दर आठवड्याला एक सदस्य घराबाहेर पडतो. त्याप्रमाणे आज हीना पांचाळ आज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते पण कमी मते पडल्यामुळे हीनाला घराबाहेर जावे लागले.

या आठवड्यातील वीकेण्डचा डाव मध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंची, शिव-वीणाची शाळा घेतली. अभिजीत बिचुकले नेहमीच चर्चेत असतात. मांजरेकर यांनी बिचुकलेंना घरात इतर सदस्यांची लायकी का काढता असा जाब विचारला. तर घरातील सदस्यांनादेखील बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी आहे का ?’ असा प्रश्न विचारला. त्यावर बहुतेक सदस्यांनी बिचुकले यांची त्यांच्यासोबत राहण्याची लायकी नाही असे उत्तर दिले.