बिकिनीतला फोटो बघून ट्रोल करणांऱ्यांना कंगना म्हणते…

0
264

 

मुबई, दि. २४ (पीसीबी) -कंगना रनौत सातत्याने सोशल मीडियावर काही ना काही बोलत असते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर खरंतर तिच्या या बोलण्याला धार आली होती. ती सातत्याने महाराष्ट्रावर टीका करत होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही तिने सोडलं नाही. पण आता कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोमुळे. हा फोटो टाकून अवघे दहा तासही उलटले नाहीत. पण कंगनाने दिलेल्या उत्तरामुळे मात्र सोशल मीडियावर एकच गहजब उडाला आहे.

कंगनाने साधारण दहा तासांपूर्वी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. तिचा मेक्सिकोतल्या एका बेटावरचा हा जुना फोटो होता. या फोटोत कंगना पाठमोरी दिसते. तिने केस सोडले आहेत आणि ती या बीचवर बसली आहे. हा फोटो पाहता ती बिकीनीमध्ये या बीचवर बसली आहे हे सहज ओळखता येतं. हा फोटो टाकून दहा तास उलटले नाहीत तर कंगनावर या फोटोमुळे ट्रोलकरी तुटून पडेल आहेत. कंगनाला ट्रोलकऱ्याची ही टीका सहन झालेली नाही. म्हणून आता अखेर कंगना बोलली. आपल्या फोटोवर आलेल्या ट्रोलकऱ्यांच्या कमेंट्सना तिने आणखी एक पोस्ट करून उत्तर दिलं आहे. या पोस्टमुळे मात्र आणखी चर्चेला उधाण आलं आहे.

कंगनाने दोन तासांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये आपल्या बिकिनी फोटोचा उल्लेख केला आहे. त्यावर तिने कट्टर हिंदूत्ववाद्यांना आणि सनातन विचारसरणीच्या लोकांना धारेवर धरलं आहे. यावर बोलताना ती म्हणते, काही लोक माझा बिकिनीतला फोटो बघून मला धर्म आणि सनातनचं लेक्चर देऊ लागले आहेत. समजा कधी देवी भेरवी आपले केस मोकळे सोडून विवस्त्र.. दुष्टांचं मर्दन करणाऱ्या रुपात समोर आली असती तर मग अशावेळी तुमचं काय होईल? तुमची तर भीतीने गाळण उडेल आणि तुम्ही स्वत:ला भक्त समजत आहात. धर्माचं पालन करा. त्याचे ठेकेदार होऊ नका… जय श्रीराम.