बिअर शॉपी फोडून हजारो रुपयांची दारू चोरीला…

0
266
CHICAGO, ILLINOIS - MARCH 19: Liquor sits in the window of a shuttered bar in the Chicago Loop on March 19, 2020 in Chicago, Illinois. Illinois Governor J.B. Prtizker recently ordered the closing of all bars and dine-in restaurants in the state in an attempt to curtail the spread of the coronavirus (COVID-19). Some restaurants remain open serving carry-out and delivery customers. Scott Olson/Getty Images/AFP == FOR NEWSPAPERS, INTERNET, TELCOS & TELEVISION USE ONLY ==

चाकण, दि. १२ (पीसीबी) – चाकण मार्केट यार्ड येथे असलेल्या अजिंक्य बिअर शॉपीचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि बिअर दारू असा एकूण दहा हजार 160 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री आठ ते मंगळवारी (दि. 11) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडली.

अशोक ज्ञानोबा बिरदवडे (वय 60, रा. मार्केटयार्ड शेजारी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिरदवडे यांचे चाकण मार्केट यार्डमध्ये अजिंक्य बिअर शॉपी नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांनी कुलूप लाऊन दुकान बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूचा सिमेंटचा पत्रा उचकटून बिअर शॉपीमध्ये प्रवेश केला.

दुकानातून 1800 रुपये रोख रक्कम, 7 हजार 200 रुपयांची सुला कंपनीची दारू, 960 रुपयांची सुला कंपनीची दारू, 1200 रुपये किमतीची डॉक्टर खास कंपनीची दारू असा एकूण 10 हजार 160 रुपयांचा माल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण तपास करीत आहेत.