बाहेरच्या मुलांना सोसायटीत घेऊ नका म्हटल्याने दोघांना मारहाण

0
560

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – बाहेरच्या मुलांना सोसायटीत घेऊ नका म्हटल्याने सोसायटीमध्ये राहणाऱ्या तिघांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना 10 मे रोजी सकाळी सुखवानी पार्क उद्यमनगर पिंपरी येथे घडली.

अतुल शिंदे वय 19, अक्षय सोमवंशी वय 24, मोहन गिरी वय 25 अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ग्यान ईश्वरदास अदलखा वय 65, रा. उद्यमनगर, पिंपरी यांनी बुधवारी दि. 12 पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. आरोपी यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये बाहेरच्या मुलांना आणले. त्यामुळे फिर्यादी यांनी बाहेरची मुले सोसायटी घेऊ नका असे आरोपींना सांगितले. यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला कमरेचा बेल्ट, लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.