बावधन येथे खिडकीचे गज कापून ६० हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

0
551

हिंजवडी, दि. १३ (पीसीबी) – खिडकीचे गज कापून घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख असा ६० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरु नेला. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री उघडकीस आली.

याप्रकरणी चंदा सुभाष कुलकर्णी (वय ५२, रा. विज्ञाननगर, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदा यांचा बावधन विज्ञाननगर येथे बंगला आहे. तो बंगला ८ ते १० मार्च या कालावधीत कुलूप लावून बंद होता. चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून शयनगृहामधील पत्र्याच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि किचन मधील पत्र्याच्या कपाटात ठेवलेली रोकड असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार वल्टे तपास करत आहेत.