बावधन येथील झोपडीतल्या चुलीत जबरदस्त स्फोट; १३ वर्षीय चिमुकली गंभीर भाजली

0
512

बावधन, दि. ३ (पीसीबी) – चुलीवर स्वयंपाक करत असताना चुलीमध्ये जोरदार स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी बाराच्या सुमारास बावधन येथील मर्सडीज कंपनीच्या पाठीमागे असलेल्या झोपडीत घडली.

हसीना (वय १३) असे स्फोटात गंभीर भाजलेल्या मुलीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडीत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्‌फोट झालेल्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक पाचारण करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बाराच्या सुमारास बावधन येथील मर्सडीज कंपनीच्या पाठीमागच्या बाजूस एका झोपडातील चुलीत जोरदार स्फोट झाला. यावेळी या चुलीवर हसीना स्वयंपाक करत होती. यामुळे ती गंभीर रित्या भाजली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि बॉम्ब शोधक पथक पाचारण. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.