बाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायी आहेत – नरेंद्र मोदी

0
335

नवी दिल्ली, २३ (पीसीबी) – जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.