बाळासाहेब नसते, तर आज मी जिवंत नसतो – अमिताभ बच्चन

0
1868

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – ‘बाळासाहेब नसते, तर आज मी जिवंत नसतो, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचले.  तेव्हा शिवसेनेची रुग्णवाहिका वेळेवर आली नसती, तर माझी प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असे अभिनेते अमिताभ बच्चन  यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले.   

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या टिझर लॉन्च सोहळा   मुंबईमध्ये  झाला.  यावेळी बोलताना  बच्चन यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी   ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघाताबद्दल सांगितले.  त्यावेळी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कँडीला पोहचू शकलो. आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले.

माझे आणि बाळासाहेबांचे कायमच जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्ही एककमेकांचा आदर करायचो, तसेच बाळासाहेब  पत्नी जयावर त्यांच्या लेकीप्रमाणे प्रेम करायचे, असेही अमिताभ यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी बाळासाहेबांबरोबरच अनेक किस्सेही यावेळी सांगितले.