बाळासाहेब काकडे, कल्पना वाढे यांना कला गौरव पुरस्कार जाहीर

0
608

पुणे, दि. २५ (पीसीबी) – बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा कला गौरव पुरस्कार पुण्यातील चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे  बाळासाहेब काकडे  आणि कल्पना वाढे यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम लवकरच मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये घेण्यात येणार आहे. आतापर्यंत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.