बाळासाहेबांना प्रश्न पडला असेल, कुठे नेवून ठेवलीय शिवसेना माझी ? – हितेंद्र ठाकूर

0
653

पालघर, दि. २१ (पीसीबी) – कुठे नेवून ठेवलीय शिवसेना माझी ? असा प्रश्न दिवंगत शिवसेना प्रमुख  बाळासाहेब यांना पडला असेल, अशा शब्दांत  बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पालघर लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ठाकूर बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पालघर पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर केला.

यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, आनंद दिघेंना मान होता आता दाढी वाढवून दिघे बनण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला शिवसेना नेते  एकनाथ शिंदे यांचे नांव न घेता ठाकूर यांनी लगावला. भाजप-शिवसेनेला सत्तेचा मिजास आला आहे, मात्र यावेळी मतदार तो उतरवणार, असे ठाकूर म्हणाले.  जाहिरात बघून तेल आणि साबण ठीक आहे, पण मात्र पंतप्रधान नको, अशा शब्दांत मोदीवर त्यांनी निशाणा साधला.