“बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका,- अमेय खोपकर

0
758

मुंबई, दि.२२ (पीसीबी) – बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असे आवाहन करणारे ट्विट त्यांनी केले आहे. मनसे मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेय खोपकर यांनी हे ट्विट केले आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”.

पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…

निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ

मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ

बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा