बाळांची नावं कोविड, कोरोना, सॅनिटाझर, क्वारंटाइन

0
308

मेरठ, दि. १(पीसीबी) – भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या दोन लाखांकडे गेली आहे. कोरोना व्हायरस महामारी रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना हा रोग झालाय किंवा बाधितांच्या संपर्कात आल्यास अशांना क्वारंटाइन केलं जात आहे. त्यामुळे त्यामुळे सध्या सर्वांच्या कानी कोरोना, क्वारंटाइन, सॅनिटाझर आणि लॉकडाऊन हेच शब्द पडत आहेत. त्याचा परिणाम नवजात बाळाच्या नामकरणावरही झाल्याचे दिसून आले. उत्तरप्रदेशातील मेरठच्या कुटुंबांनी चक्क जुळ्या बाळांची नावं सॅनिटाझर आणि क्वारंटाइन ठेवली आहे. त्यामुशे मेरठच्या मोदीपुरम भागातील पाबरसा इथं राहणारे वेणू आणि धर्मेंद्र दाम्पत्यांची ही लेकरं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत.

वेणू आणि धर्मेंद्र यांना मुलांची नावं अशी ठेवण्यामागे विचारले असता ते म्हणाले की, क्वारंटाइन आणि सॅनिटायजर जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. या दोन्ही गोष्टी आपली कोरोनासारख्या रोगांपासून सुरक्षा करतात. ही सुरक्षिततेची भावना आयुष्यभर कायम रहावी म्हणून जुळ्यांची नावं क्वारंटाइन आणि सॅनिटायजर ठेवली आहेत.

वेणू यांनी सांगितले की, प्रसूती दरम्यान मला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी माझी कोव्हिड चाचणीही करण्यात आली होती. एकवेळअशीही होती जेव्हा कोणी उपचार करण्यास तयार नव्हते. त्यावेळी डॉ. प्रतिमा तोमर यांनी माझी प्रसूती करत साथ दिली. त्यामुळं सुरक्षित प्रसुती झाली. हा सर्व प्रकरा घडत असताना मुलाची नावं क्वारंटाइन आणि सॅनिटायजर ठेवण्याचा निश्चय केला.
छत्तीसगढमध्ये जुळ्यांची नावं करोना आणि कोविड
छत्तीसडच्या रायपूरमध्ये २७ मार्च रोजी एक महिलेनं जुळ्यांना जन्म दिला. विशेष म्हणजे, कुटुंबीयांनी त्यांची नावे “कोविड आणि कोरोना,” अशी ठेवली आहेत. लोकांच्या मनातील या महामारीची भीती दूर करण्यासाठी या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी या मुलांची नावेच कोवीड आणि कोरोना, अशी ठेवली आहेत.