बाल चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून लहान मुलांना सत्य-असत्याची जाणीव होईल – महापौर

0
699

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – लहान मुले देशाचे भविष्य आहेत. त्यांना चित्रपटांच्या माध्यमातून सत्य-असत्याची जाणीव व्हावी. सत्याला समोरे जाऊन सर्वांनी अपले उज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन महपौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी (दि. २३) केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व फोर्ब्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यामाने चिंचवडमधील कार्निवल सिनेमामध्ये शुक्रवार (दि. २३) ते  रविवार (दि. २५) या दरम्यान आयोजित बाल चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महापौर जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहशहर अभियंता प्रविण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, फोर्ब्स मार्शल कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्स, सीएसआरच्या बिना जोशी, प्रशासन अधिकारी पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले, बाल चित्रपट तज्ज्ञ प्रसन्ना हुलकवी, विजय वावरे आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “बाल चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून लहान मुलांचे व्यक्तीमत्व विकास वाढण्यास मदत होईल. महोत्सवात आयोजित केलेल्या कार्यशाळेतून चित्रपट कसे बनविले जातात याबद्दलचेज्ञान प्राप्त होईल. पडद्यामागील सत्यही तुम्हाला कळेल, असेही ते म्हाणाले.”

फोर्ब्स मार्शल कंपनीच्या संचालिका रती फोर्ब्स म्हणाल्या, “यापुढे आम्ही सीएसआरच्या माध्यमातून नदी प्रदूषणावर काम करणार आहोत. तसेच दरवर्षी बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशहर अभियंता प्रविण तुपे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी रमेश भोसले यांनी केले. बिना जोशी यांनी आभार मानले.