बालेवाडीमध्ये अज्ञात वाहनाच्या जोदार धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
541

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका ३५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बॅगलोर हायवेवर राजवाडा गेटसमोर, बालेवाडी येथे घडली.

लवन मनराज सहानी (वय ३५, रा. कात्रज) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोजकुमार कैलास सहानी (वय ३७, रा. नऱ्हे आंबेगाव, कात्रज) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.११) सकाळी आठच्या सुमारास लवन हे बालेवाडी येथील मुंबई-बॅगलोर हायवे ओलांडत होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक आणि वाहनासह पसार झाला. या घटनेत लवन यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.