Chinchwad

बालेवाडीत तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

By PCB Author

May 27, 2019

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – बालेवाडीतील मिटकॉन स्कूलजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

मारुती रामदास ढवळे (वय २३, रा. सफायर पार्क, लेबर कॅम्प, बालेवाडी मुळ रा. बुलडाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बांधकाम साईटवर मजुराचे काम करायचा. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे काही स्थानिक नागरिकांना बालेवाडीतील मिटकॉन स्कूलजवळ एक तरुण मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केला असता मयताचे नाव मारुती ढवळे असून त्याच्या डोक्यात दगड मारुन खून केल्याचे समोर आले आहे. खून कोणी आणि का केली हे अद्याप समजू शकले नाही. चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करत आहेत.