बालरंगभूमीचे जनक श्रीनिवास शिंदगी यांचे निधन

0
437

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – बालरंगभूमीचे जनक साहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

शिंदगी सरांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर , स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा,  भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक नाटक गाजली आहेत. शिंदगी सरांच्या मार्गदर्शनाखाली बालवयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजण पुढे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक झाले. शिंदगी सरांचे बालरंगभूमीवरचे योगदान पाहून नाटककार केशवराव दाते यांनी त्यांनी ‘बालरंगभूमीचे जनक’ अशी उपाधी दिली होती. शिंदगी सरांनी अनेक कथा, कविता, कविता संग्रह,  गीते, नाटके, स्फुट लेखन, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्या बरोबरच त्याचे व्यावसायिक नाटकांमध्ये फार मोठे योगदान आहे.