बारावीचा निकाल उद्या ऑनलाईन

0
300

पुणे, दि. १५ (पीसीबी) : राज्यातील बारावीच्या परिक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल.

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल
• www.mahresult.nic.in
• www.hscresult.mkcl.org
• www.maharashtraeduction.com
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली. कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. एरव्ही मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं.

बोर्डाच्या सूचना
1) ऑनलाईन निकालाबाबत लगेच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळालवरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत:च्या किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवारी 17 जुलै ते सोमवार 27 जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार 17 जुलै ते बुधवार 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल
2) फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच
पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
3) फेब्रुवारी-मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.