बारामती येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांचा निर्घृन खून

0
595

बारामती, दि. १३ (पीसीबी) – बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ तारखेला उजनी धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सोलापूरपुणे ब्रिजच्या खाली एक मृतदेह सापडला होता. या इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. हा मृतदेह दादा साळुंखे यांचाच असल्याची ओळख आता पटली आहे. घटनास्थळी टायरचे ठसेही दिसून आले आहेत.