Notifications

बारामती मधून अजित पवारांचा पराभव अशक्य – चंद्रकांत पाटील

By PCB Author

July 08, 2019

बारामती, दि, ८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली असली तरी बारामती मधून अजित पवार यांचा पराभव करणे हा फक्त आशावाद ठरेल, परंतू आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार यांच्या नक्की पराभव करु, असे चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 

बोलताना पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती जिंकणार असा दावा मी कधिच केला नव्हता. कारण बारामतीमध्ये अजितदादांनी केलेली विकास कामे पाहता त्यांना बारामतीत पराभूत करणे हा आशावाद ठरेल. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघावर निश्चितपणे वर्चस्व गाजवू असे पाटील म्हणाले.

मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे त्यामुळे मी हे खुलेपणाने मान्य करतो, असे सांगत या माझ्या विधानामुळे अजित दादांनाही निश्चित बरं वाटेल अशी पुस्तीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जोडली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना निम्म्या निम्म्या जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.