बारामती जिंकण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा – आमदार मिसाळ

0
736

बारामती, दि. ७ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी काही तालुक्यांत पवारविरोधी वातावरण आहे. २०१४च्या निवडणुकीत महादेव जानकर यांचा थोड्या मतांनी पराभव झाला आहे. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वप्न  आपल्याला पूर्ण करून दाखवायचे आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सुचना  बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या प्रभारी व पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी दिल्या.  

सासवड ( ता. पुरंदर ) येथे आगामी लोकसभा  निवडणुकीच्या  तयारीचा आढावा घेण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदर या चार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी माधुरी मिसाळ  बोलत होत्या.

मिसाळ म्हणाल्या की, आता घेतल्या जाणाऱ्या  बैठका या  भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी असतील. तेव्हा कोण पदाधिकारी किंवा कोण कार्यकर्ता याविषयी जास्त खोलात न जाता सर्वजणच पदाधिकारी आहेत, असे समजून कामाला लागावे. आपल्या हातात सत्ता असून सत्तेतून सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.