बारामतीत सुप्रिया सुळेंना धक्का; राष्ट्रवादी निरीक्षकाचा भाजपमध्ये प्रवेश

0
776

बारामती, दि. १४ (पीसीबी) –  बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या कांचन कुल यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस  बारामतीचे निरीक्षक राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  त्यामुळे ऐन निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  बारामतीमधील सुप्यामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी  शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल शेवाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देखील आहेत.  काही दिवसांपासून त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

सुळे यांच्याविरोधात भाजपने कांचन कुल यांच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. यामुळे प्रचारात सुळे यांची चांगली दमछाक होत आहे. त्यातच शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून  राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान बारामतीतील लढत रंगदार अवस्थेत पोहचली असून येथे कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.