बारामतीत शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार एकाच व्यासपीठावर

0
587

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – केंद्र सरकारची ‘वयोश्री योजना’ यशस्वीपणे राबवण्याच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने बारामतीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (दि.१५)  एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघावरुन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात एकमेकांवर टोले प्रतिटोले दिले आहेत. त्यानंतर, हे दोघेही बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे बारामतीत येऊन मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही पूर्ण ताकदीने ४८ जागांवर निवडणूक लढणार आहोत. मागच्या वेळी ४२ जागा जिंकल्या होत्या, यावेळी ४३ जागा जिंकू आणि ही ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला होता.