Maharashtra

बायको शिवसेनेसारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. – नितेश राणे

By PCB Author

December 31, 2018

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  असंख्य नवरे बोलत असतील. बायको शिवसेनेसारखी पाहिजे!! लफडी कळली तरी सोडत नाही.. जास्तच जास्त तर काय.. एक सामन्यातून अग्रलेख!!  बाकी संसार सुरु!! अशा शब्दांत ट्विट करुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर  बोचऱ्या शब्दांत   टीकास्त्र सोडले आहे.  

आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद महाराष्ट्राला  नवीन नाही. राणेंवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत  नाही. तर शिवसेनेवर हल्ला चढवण्यास  नितेश राणे नेहमीच तयार असतात. आता, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला त्यांच्याच भाषेत  उत्तर दिले आहे. असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखीच पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही, अशा शब्दात नितेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, आजच्या सामनातील अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता, नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला आहे.  नितेश राणेंनी सामनातील या अग्रलेखावर ट्विट करून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.