बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

0
585

पुणे, दि. २१ (पीसीबी) – ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां निर्मलाताई बळवंत पुरंदरे (वय ८६) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी रात्री निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून निर्मलाताई आजारी होत्या.

त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, तर पुरंदरे प्रकाशनचे अमृत पुरंदरे, प्रसिद्ध गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे आणि थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या त्या मातोश्री होत.

विद्यार्थी सहायक समिती आणि फ्रान्स मित्र मंडळाच्या माध्यमातून निर्मलाताई पुरंदरे यांनी मोलाचे योगदान दिले होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आदिशक्ती पुरस्कार आणि सावित्रीबाई पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.