बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिम समाजावर असंख्य उपकार – असदुद्दीन ओवेसी

0
648

नांदेड, दि. १८ (पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुस्लिम समाजावर असंख्य उपकार आहेत. त्याची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्रातील मुस्लिमांनी डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे खासदार निवडून द्यावेत, असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

गुरूवारी नांदेडमध्ये वंचित बहुजन समाज आघाडीची सभा झाली. या सभेत बोलताना खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरुन आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. काँग्रेसवर टिका करतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही ओवेसी यांनी टिकास्त्र सोडले.

पंधरा वर्षांची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोणी, दही चाटून खाल्ले. दूधही पिऊन टाकले. पण भ्रष्टाचाराच्या नावाखाली एकट्या छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावे लागले. आता छगन भुजबळ यांनाही कळून चुकले असेल, असा टोला ओवेसी यांनी लगावला.