“बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार”

0
349

मुंबई, दि.२१ (पीसीबी)- सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच खासदार संजय राऊत हे निवडणुकांच्या निकालापासूनच सातत्यानं शिवसेनेची भूमिका मांडत आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही राऊत हे सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये व्यस्त आहेत. अशातच संजय राऊत यांची कन्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दिल्लीतच आहे. राज्यातील सत्तास्थापनेबद्दल तिनेही आपले मत व्यक्त केलं आहे. बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार, असे मत त्यांची कन्या विधीता राऊत हिने व्यक्त केले.