बाप गेल्याचं दु:ख निबंधातून मांडणाऱ्या मुलाची मंत्री धनंजय मुंडेनी घेतली दखल

0
589

मुंबई,दि.१९(पीसीबी) – मंगेश वाळके या बीड जिल्ह्यातील वाळकेवाडीतल्या शाळेत चौथीमध्ये शिकत असललेल्या लहान मुलानं आपल्या वारलेल्या वडिलांवर लिहिलेला निबंध आज दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला. या निबंधाची दखल सामाजित न्याय विकास मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

“माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबी च्या आजाराने वारले. मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली. आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला व आईला रात्रीची चोरांची भीती वाटते. त्यामुळे पप्पा तुम्ही परत या” असा निबंध मंगेशनं लिहिला. मंगेशची आई अपंग आहे.

धनंजय मुंडे यांनी तात्काळ माज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5% बसचा पास आणि दिव्यांग महामंडळामार्फत आणखी काही योजना लागू करून भरीव आर्थिक मदत करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे.