“बाप्पा” ..पुढच्या वर्षी लवकर या’; अकरा तासाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर पिंपरीत गणरायाला निरोप

0
595

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – गेल्या अकरा दिवसांपासून सर्व दुःख, चिंता विसरायला लावणाऱ्या गजाननाला पिंपरी परिसरातून रविवारी (दि. २३) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशा दणदणाट, पथकांचे पारंपरिक वादन, डीजे, सनई चौघडा यांसारखी वाद्ये, ‘’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, ‘’गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’’ असा गणेश भक्तांचा दाटलेला कंठांनी सर्वत्र परिसरात बाप्पामय वातावरण पसरल्याचे चित्र पाहायला मिळत होते.  तब्बल अकरा तास चाललेल्या मिरवणुकीत ६१ गणेश मंडळांनी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले.