बापरे | वाढत्या बर्ड फ्लूमुळे भारतातील पोल्ट्री उद्योगाचे झाले तब्बल ‘एवढ्या’ कोटींचे नुकसान

0
221

थेट तीन कोटी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनावर परिणाम 

नवी दिल्ली, दि.१२ (पीसीबी) : भारतात बर्ड फ्लूचा एका महिन्याच्या आतच नऊ राज्यात प्रादुर्भाव वेगाने झाल्याने सगळीकडे चिंताजनक वातावरण आहे. लोकांना आणखी एक विषाणूचा प्रादुर्भावामुळे एव्हीयन इन्फ्लूएन्झाने भारताच्या पोल्ट्री क्षेत्रावरही परिणाम करण्यास सुरवात केली आहे आणि यामुळे थेट तीन कोटी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनावर परिणाम होतो.

बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाचा आर्थिक परिणाम दूरगामी असू शकतो, बर्ड फ्लू मुळे पोल्ट्री उत्पादनांच्या किंमती खाली आल्या आहेत, केवळ बर्ड फ्लू बाधित नऊ राज्यांमध्येच नव्हे तर इतर राज्यात व केंद्रशासित प्रदेशातही जिथे अद्यापही व्हायरस सापडलेला नसतानाही तेथील पोल्ट्री उत्पादनांच्या किंमती खाली आल्या आहेत. भारत दरमहा सुमारे 30 कोटी अंडी आणि 900 कोटी कोंबडी वापरतो आणि देशातील पोल्ट्री क्षेत्राची किंमत 80,000 कोटी रुपये आहे. या परिस्थितीमुळे उद्योगात गुंतलेल्या कोट्यवधींच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे. कारण बर्ड फ्लूची भीती अधिकाधिक लोकांना पोल्ट्री आणि कुक्कुटपालन उत्पादनापासून परावृत्त करत आहे. उत्तर प्रदेशच्या कैसरबाग येथील पोल्ट्री शॉपच्या मालकाने म्हटले आहे कि,’सहसा हिवाळ्यामध्ये आमचा व्यवसाय वाढतो, पण त्यात 50 टक्के घसरण दिसून येत आहे. ‘कोविड-१’ च्या दरम्यान झालेले नुकसान भरून काढण्याचा आम्ही विचार केला होता. मात्र, बर्ड फ्लूमुळे हे अवघड दिसत आहे.”

चेन्नई येथील दुसर्‍या पोल्ट्री रिटेल पुरवठादाराने सांगितले की, ‘भारतात पोल्ट्री उद्योगातील १.७५ लाख कोटी रुपयांच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विक्रीमध्ये घट झाली आहे.” दरम्यान, केरळमधील पोल्ट्री फार्ममधील पर्यवेक्षकाने सांगितले की, “चिकनचा वापर ६० टक्क्यांनी कमी झाला आहे, परिणामी किंमत कमी झाली आहे. बर्ड फ्लूमुळे आम्हाला किंमती कमी कराव्या लागत आहेत.”

याव्यतिरिक्त, बर्ड फ्लू वेगाने पसरत असल्यापासून पोल्ट्री उत्पादनांचा पुरवठादार वेंकीजच्या शेअर्सच्या किंमतीत ६ जानेवारीला पाच टक्क्यांहून अधिक कमी झाले आहेत.भारत आणि कुक्कुटपालन क्षेत्राच्या वाढीव वार्षिक वाढीचा अंदाज २०१९ ते २०२४ दरम्यान १६.२ टक्के राहील असा अंदाज होता. परंतु या घटनांमुळे हे लक्ष्य साध्य करणे कदाचित अवघड असेल.