बापरे! एवढं मोठ्ठ घबाड कधीही चोरट्यांच्या हाती लागलं नसेल… किंमत ऐकून व्हाल थक्क

0
319

देहूरोड, दि.१० (पीसीबी) – विकासनगर परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.9) पहाटे उघडकीस आली आहे.

रवींद्रन आरोक्यस्वामी जोसेफ (वय 43, रा. तळेगाव स्टेशन) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विकासनगर येथे वामन रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये फ्लॅट आहे. त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. दरम्यान शुक्रवारी रात्री साडेदहा ते शनिवारी पहाटे साडेतीन या कालावधीत त्यांच्या फ्लॅटच्या सेफ्टी डोअरचा कोयंडा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी 20 तोळे दोन ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. त्यात मंगळसूत्र, बांगड्या, ब्रेसलेट, अंगठ्या, नेकलेस असे दागिने होते. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.