बापरे! ‘इथे’ कोरोना मृतदेहांना खांदा देण्यासाठी मोजावे लागतात हजारो रुपये; मृताला मोक्ष देण्याचा खर्च सुद्धाअव्वाच्या सव्वा

0
421

वाराणसी, दि.११ (पीसीबी) : हरिश्चंद्र घाटाच्या 1५ पायर्‍या आणि १०० मीटर पर्यंत मृतदेहाला खांदा देण्यासाठी ३५०० ते ४००० रुपये दर ठेवण्यात आला आहे. नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी १७ ते २२,००० रुपये खर्च करावे लागतात.

जिथे मानवाला मोक्ष मिळतो त्या जागेच हे भयानक वास्तव आहे. प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावरती बसवत नातेवाईकांना कोरोना बाधित लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी आपले खिसे खाली करायला भाग पाडले जाते.

धर्म, अध्यात्म आणि मोक्ष मिळण्याच्या या जागी शेवटच्या प्रवासादरम्यान मृतदेहाना खांदा देणं हे एक कर्तव्य मानले जाते, तर कोरोना संक्रमणामुळे शेवटच्या प्रवासामध्ये चार खांदे मिळणे कठीण झाले आहे. कुटूंबाची असहायता लक्षात घेऊन हरिश्चंद्र घाटावरती खांदा देण्यासाठी 100 मीटरपर्यंत आणि 15 पायर्‍या चढण्यासाठी ३५०० ते ४००० रुपये आकारले जातात.

सुरुवातीला हा दर पाच ते सहा हजार रुपये होता, परंतु मृत्यूची संख्या वाढल्यामुळे खांदा देणार्यांचे प्रमाणही चार पट वाढले आहे. सरकार आणि प्रशासनाने कोरोनाची लागण झालेल्याचे अंत्यसंस्कार मोफत ठेवले आहे, परंतु वास्तव वेगळे आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाला आता १७ ते २२,००० रुपये खर्च करावे लागतात.

मोक्ष मिळण्याच्या जागी काशीमध्ये आता पैशांशिवाय चार खांदेसुद्धा उपलब्ध नाहीत. कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूमुळे होणाऱ्या शेवटच्या प्रवासालाही कुटुंबीय सहभागी होऊ शकत नाहीत. परिस्थिती अशी बनली आहे की मृतदेह घेऊन फक्त एक-दोन माणसे घाटावर येत आहेत. अशा परिस्थितीत मृतदेह रस्त्यावरुन पायरीपर्यंत नेण्यासाठी चार खांद्यांची किंमत १६,००० रुपयांपर्यंत आहे. काही तरुणांची टीम पैशासाठी तळहातावर जीव ठेवून हे काम करीत आहे. हे काम करणे म्हणजे एका बाजूची गरज आहे आणि दुसरी बाजू असहायता आहे.