बाणेर येथे आनव्ही हियरिंग इन्कॉ बेस्टसाऊंड सेंटरचे उद्घाटन   

0
465

पुणे, दि.२२ (पीसीबी) – आनव्ही हियरिंग इन्कॉ बेस्टसाऊंड सेंटरच्या बाणेर केंद्राचे आज सिवांतो इंडियाचे संचालक विजयन वॉरियर यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले. या प्रसंगी सिवांतो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार, फरखान शेठवाला (मॅनेजर, बिझिनेस डेव्हलपमेंट), विशाल शाह (मुख्य कार्यकारी अधिकारी, आनव्ही हियरिंग), अमित शाह (संचालक, आनव्ही हियरिंग) आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्रवण दोष -ऐकायला कमी येण्याची समस्या कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकते. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जगातील सुमारे ६ टक्के लोकांमध्ये काही ना काही श्रवणदोष-ऐकायला येण्याच्या समस्या असतात असे संशोधनात दिसून आलेले आहे. ही गोष्ट विचारात घेऊन श्रवणदोषांवर मात करून चांगले ऐकू आनंद मिळवण्यासाठी सिवांतो इंडिया प्रा. लि. ने बाणेर, पुणे येथे आनवी हियरिंग इन्कॉ. सुरू केले आहे असे विजयन वॉरियर यांनी सांगितले.

ऐकण्यासंबंधीच्या सर्व प्रकारच्या समस्यांरील उपाय, त्या दूर करण्यसाठी अत्याधुनिक, सर्वोत्तम दर्जाची श्रवण यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता पुणेकरांना चांगले ऐकण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल असे सांगून विशाल शाह पुढे म्हणाले, की भारतात बेस्टसाऊंडची १६० केंद्र असून पुण्यातील हे तिसरे केंद्र आहे.