Pune

बाणेरमधल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पर्दाफाश

By PCB Author

January 30, 2019

बाणेर, दि. ३० (पीसीबी) – स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी स्पा चालविणारा तरुण जयदीप रवींद्र अणेचा (वय ३६, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) याला अटक करण्यात आली असून थायलंडच्या दोन तरुणीसह तिघींची सुटका करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तेथे पोलिसांनी छापा मारला.  त्यात तीन तरुणी आढळून आल्या. त्यातील दोघी थायलंडच्या असून एक लावोस देशातील आहे. या तिघींना थेरपीस्ट म्हणून नोकरीवर ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.  हा स्पा चालविणाऱ्या जयदीप अणेचा याला पोलिसांनी अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.