बाई तू लवकर माझ्या गावचा रस्ता धर, मी तुझी आतुरतेने वाट बघतेय – स्मिता आष्टेकर

0
788

नगर, दि.१८ (पीसीबी) – तृप्ती देसाई अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. त्याआधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असे आव्हान देसाईंना दिले आहे.

तर तृप्ती देसाई नगरमध्ये आल्यानंतर वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी देसाईंना शहरात पाय ठेवून दाखवाच, असे ओपन चॅलेंज दिले आहे. मात्र शिवसेनेचे नगर शहर अध्यक्ष दिलीप सातपुते यांनी पत्रक काढून आष्टेकरांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तर स्मिता देसाई यांनीदेखील आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही अहमदनगरमध्ये येणारच. दुपारी एक वाजता पोहचणार आहोत, असे तृप्ती देसाई यांनी आष्टेकरांच्या आवाहनानंतर स्पष्ट केले आहे

याच पार्श्वभूमिवर आष्टेकर म्हणाल्या , कोण ती तृप्ती देसाई, माझ्या नगर जिल्ह्यात येणार आहे, असं मी ऐकले. माझा तिला निरोप आहे, की बाई तू लवकर माझ्या गावचा रस्ता धर, मी तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी. ये, तुझ्या स्वागताची तयारी मी नगर शहरात करुन ठेवली आहे.’

जय महाराष्ट्र. जय हिंदुराष्ट्र सेना.

Gepostet von Smita Ashtekar am Montag, 17. Februar 2020