बाईकवरून बायको पडल्याची नवऱ्याला पत्ताच नाही; पोलिस आले मदतीला

0
580

लखनौ, दि. १० (पीसीबी) – उत्तर प्रदेशमधील एक मजेदार आणि विचार करायाला लावणारी घटना समोर आली आहे. ही घटना पाहून तुम्ही उत्तर प्रदेश पोलिसांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत बाईकवर जात होता. त्यावेळी अचानक आलेल्या स्पीड ब्रेकर आला. स्पीड ब्रेकरवर झटका लागल्याने पत्नी खाली पडली. पण नवऱ्याला काही समजलेच नाही. तो बाईकवर तसाच पुढे गेला.

पती गेल्यामुळे रस्त्याच्या बाजूला दुखापतग्रस्त पत्नी चिंतेत होती. योगायोगाने त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांची @up100 येताना पत्नीला दिसली. पत्नीने पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांना सर्व घटना सांगितल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले. पोलिसांनी बाईकचा पाठलाग करत पती-पत्नीची भेट घडवून देण्याचा निर्णय घेतला. पाच किमी. पर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांना यश आले. त्यावेळी पतीला समजले की आपली पत्नी पडली होती.

या सर्व घटनेची माहिती उत्तर प्रदेशचे चर्चित आयपीएस आधिकारी नवनीत सिकेरा यांनी आपल्या फेसबुक पेजवर दिली. यावेळी त्यांनी या घटनेचे मजेदार वर्णन करत दोघांचा फोटोही पोस्ट केला आहे.