Pimpri

बांधकाम साईटवरून पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

By PCB Author

October 29, 2020

आकुर्डी, दि. २९ (पीसीबी) – बांधकाम साईटवर काम करत असताना पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शीतळादेवी मंदिराशेजारी आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी संभाजी गालट (वय 40, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिक विनोद तुकाराम आडस्कर (रा. आकुर्डी), ठेकेदार राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), ठेकेदार बनसोडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयत शिवाजी यांचा भाऊ मारुती संभाजी गालट (वय 49, रा. किवळे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आडस्कर यांची आकुर्डी येथील शीतळा देवी मंदिराजवळ बांधकाम साईट सुरु आहे. त्यावर मयत शिवाजी काम करत होता. 18 ऑक्टोबर रोजी काम करत असता शिवाजी साईटवरून खाली पडले. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 26 ऑक्टोबर रोजी शिवाजी यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.