Pimpri

बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामासाठी भीमसेन अग्रवाल यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

By PCB Author

June 29, 2019

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) –  अण्णासाहेब मगर सोशल आणि  स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी बांधकाम व्यवसायिकांना बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र भूषण म्हणून यंदा पिंपरी चिंचवड मधील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक एस्सेन ग्रुपचे चेअरमन भीमसेन अग्रवाल यांना सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार  प्रदान करून गौरविण्यात  आले.

अण्णासाहेब मगर फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी केले होते.

पिंपरी चिंचवडचे विश्‍वसनीय वबांधकाम व्यवसायिक म्हणून ऐश्‍वर्यम्  ग्रुप  चे चेयअरमेन भीमसेन अग्रवाल यांना आळखले जाते. यांनी संस्थेच्या वतीने सुमारे २१५ ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ व जीएसटी आणि अन्य छुप्या खर्चात सुट मिळवून देत, जो फ्लॅट २५ लाखाचा आहे, तो फक्त सुमारे १९ लाख ७३ हजार रूपयात  ग्राहकांना उपलब्ध दिला आला आहे.  आता पर्यंत कन्स्ट्रक्शन मध्ये ६ निवासी प्रोजेक्ट आणि कमर्शियल प्रोजेक्ट ऐस्सन ग्रुप ने बनविले आहे.  ऐश्‍वर्यम्, ऐश्‍वर्यम् कोर्टयार्ड, ऐश्‍वर्यम् कंफर्ट,  ऐश्‍वर्यम् निवारा, ऐश्‍वर्यम् हमारा आणि कमर्शियल मॉल ऐश्‍वर्यम् वून आणि  ऐश्‍वर्यम् कंफर्ट गोल्डचा समावेश आहे.