Pune

‘बस अँड कार ओनर्स असोसिएशन’तर्फे पुण्यात शुक्रवारी राज्यव्यापी अधिवेशन

By PCB Author

October 27, 2021

पुणे, दि. २७ (पीसीबी) : पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनतर्फे येत्या शुक्रवारी (दि. २९) राज्यव्यापी अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे ही सभा होणार असून, यामध्ये नवीन कार्यकारिणी निवड, बस आणि कार मालकांच्या बँकिंग, आरटीओ व इतर आर्थिक अडचणी, नव्या दरपत्रकाची निश्चिती, कोरोना काळात जीव गमावलेल्या बस/कार चालकांना श्रद्धांजली, वृक्षारोपण उपक्रमात सहभागी बस मालक व स्वयंसेवकचा सन्मान आदी गोष्टींचा समावेश आहे.

या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, पुणे विभागीय परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातून जवळपास ५००-६०० बस आणि कार मालक या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, सचिव तुषार जगताप, खजिनदार दिनेश सोनावणे, कार्याध्यक्ष किरण देसाई व सचिन पंचमुख यांनी दिली आहे.