Pimpri

बसमध्ये तरूणीचा विनयभंग करणाऱ्या तरूणाला निगडीत अटक

By PCB Author

February 06, 2019

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – मुंबई-निगडी बसमध्ये तरूणीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी २२ वर्षीय तरूणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अकबर मोहम्मद जहांगीर (वय ३९ रा.धारावी, मुंबई) या तरूणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.४) सकाळी साडेसात वाजता पीडित तरूणी मुंबईहून निगडीला येणाऱ्या बसमध्ये बसली होती. तर बसमध्ये तरूणींच्या पाठीमागील आसनावर आरोप बसला होता. काहीवेळाने आरोपीने आसनाच्या गॅपमधून हात घालून   तरूणीच्या पाठीला स्पर्श करत अश्लील वर्तन केले.

या प्रकरणाचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहे.