Chinchwad

बसच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

By PCB Author

March 11, 2023

सोमाटणे, दि.११ (पीसीबी) – बसच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेआठ वाजता सोमाटणे फाटा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडला.

लालमणी जयस्वाल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी श्यामनाथ हरीगेन जयस्वाल (वय ५६, रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश शहाजी भोसले (वय ३२, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश भोसले याने त्याच्या ताब्यातील बस (एमएच १४/एचयु ५३७२) भरधाव वेगात चालवली. सोमाटणे फाटा येथे फिर्यादी यांचा भाऊ लालमणी रस्ता ओलांडत असताना भोसले याच्या बसने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या लालमणी यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.