Pimpri

बसची वाट पाहत थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

By PCB Author

October 07, 2021

संभाजीनगर, दि. ७ (पीसीबी) – रस्त्यावर बसची वाट पाहत असलेल्या एकाचा 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी सहाच्या सुमारास एचडीएफसी कॉलनी बस स्टॉप, संभाजीनगर, टेल्को रोड, भोसरी येथे घडली.

कार्तिक विक्रम देवाडिगा (वय 31, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. 7) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास बस स्टॉपवर बसची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा तपास करीत आहेत.