Maharashtra

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पीडितेच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मृत्यू

By PCB Author

February 06, 2020

महाराष्ट्र, दि.६ (पीसीबी) – बलात्कार प्रकरणातील आरोपीला पीडितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना शिरपुंजे गावात घडली.

राजू गणपत सोनवणे (४५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आरोपी व्यक्तीचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ५५ वर्षीय महिला गुरांना चरण्यासाठी रानात घेऊन गेली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास तेथे कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी राजू सोनवणे याने तिच्यावर बलात्कार केला आणि जंगलात पळून गेला. याबाबत समजल्यानंतर पीडित महिलेचा मुलगा, पुतण्या आणि अन्य तिघा नातेवाईकांनी राजू सोनवणे याला पकडून आणले आणि जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला राजूर पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याला पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.