बलात्कार पीडित लहान मुलांची मुलाखत घेऊ नका; सुप्रीम कोर्टाचे वृत्तवाहिन्यांना निर्देश

0
712

दिल्ली, दि. २ (पीसीबी) – बिहारमधील मुलींच्या वसतीगृहातील बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवार) माध्यमांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. माध्यमांनी बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र दाखवू नये, तसेच चेहरा ब्लर केलेले किंवा मॉर्फ केलेले छायाचित्रदेखील वापरु नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ३० मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज (गुरुवार) बिहार बंदची हाक देण्यात आली असून सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांना काही निर्देश दिले आहेत. यामध्ये बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र मॉर्फ केलेले आणि चेहरा ब्लर केलेले सुद्धा वापरु नये, असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.